गॅस पेटवताच निळ्याऐवजी फ्लेम पिवळी-लाल-नारंगी दिसते? ५ सेकंद लक्ष द्या, ‘हा’ रंग दिसल्यास लागलीच करा छोटेसे काम!

What to do if LPG gas stove flame turns yellow : स्वयंपाकघरात गॅस शेगडीचा वापर हा सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत आपण रोजच करतो. पण चहा किंवा भाजी शिजायला ठेवताना आपण किती जण गॅसच्या ज्वालेच्या रंगाकडे पाहतो? बहुतेक जण याकडे दुर्लक्ष करतात.

पण गॅस शेगडीवर येणारा ज्वालांचा रंग हा केवळ उष्णतेचा नसून तो तुमच्या सुरक्षेचा आणि गॅस बचतीचा थेट संकेत असतो. साधारणपणे निरोगी आणि सुरक्षित गॅस शेगडीची फ्लेम ही नेहमी निळ्या रंगाची असते. याचा अर्थ गॅस व्यवस्थित सुरु आहे. पण अनेकदा गॅस पेटवल्यानंतर निळ्याऐवजी पिवळी, नारंगी, लाल किंवा अगदी हिरवट रंगाची ज्वाला दिसू लागते. शेगडीचा हा बदलणारा रंग गॅस सिलिंडर लवकर संपत असल्याचा किंवा इतर धोक्याचे संकेत असू शकतात. अशावेळी मेकेनिकला न बोलावता आपण काही गोष्टींकडे लक्ष दिले तर वेळीच आपल्यावरचा धोका टळेल.

जर गॅसची फ्लेम पिवळी किंवा नांरगी दिसू लागली, तर गॅस योग्य प्रकारे जळत नाहीये. हवेतील ऑक्सिजन आणि गॅसचे मिश्रण योग्य प्रमाणात न झाल्यामुळे असं होते. याचा अर्थ बर्नरच्या छिद्रांमध्ये अन्नकण किंवा काजळी साचली आहे. गॅस बंद करुन बर्नर पूर्ण थंड झाल्यावर बाहेर काढा आणि बारीक वायर किंवा सुईच्या मदतीने छिद्रे स्वच्छ करुन घ्या.

गॅसची फ्लेम लाल दिसत असेल तर गॅस गळतीचा किंवा धोकादायक ‘कार्बन मोनॉक्साइड’ वायू तयार होत असल्याचा इशारा असतो. लाल फ्लेम दिसताच क्षणाचाही उशीर न करता गॅस शेगडी आणि सिलेंडरचे रेग्युलेटर लगेच बंद करा. खिडक्या-दारे उघडी करा आणि लगेच मेकेनिकला बोलावून तपासून घ्या.

गॅसच्या फ्लेममध्ये हिरवा रंग दिसल्यास गॅस पाइपा लाइनमध्ये अशुद्धता असल्याचे म्हटले जाते. तर अतिशय फिकट किंवा पांढरी फ्लेम म्हणजे बर्नरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा जात आहे. ही समस्या नसली तरी गॅसची बचत होण्यासाठी बर्नर स्वच्छ करुन घ्या किंवा सर्व्हिसिंग करा.

कोणत्या वेळी लगेच गॅस बंद करावा?

  1. गॅस पेटवताच अचानक भडक लाल रंगाची ज्वाला दिसल्यास.
  2. बर्नरमधून विचित्र किंवा खूप मोठा आवाज येत असल्यास.
  3. गॅस सिलेंडर किंवा पाइपजवळून उग्र वास येत असल्यास.
  4. भांड्यांच्या तळाशी अचानक खूप जास्त काजळी साचू लागल्यास.
  5. स्वयंपाक करताना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास गॅसची बचत तर होईलच पण मोठा अनर्थ देखील टळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button