
आंजर्ले खाडीत महिन्यापूर्वी अडकलेल्या नौकेचे अवशेष अखेर बाहेर काढण्यात आले
दापोली ’समुद्रात वादळसदृश परिस्थितीवेळी जलसमाधी मिळालेली बोट महिनाभरानंतर वाहत येऊन तालुक्यातील आंजर्ले खाडीत येऊन अडकली होती. या बोटीच्या मालकाने मुंबईमधून दापोलीत येऊन ही बोट खाडीच्या पाण्यातून बाहेर काढून तिची विल्हेवाट लावल्याचे सांगण्यात आले.
मे महिन्यात पावसामुळे समुद्रात काही काळ वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी हर्णे समुद्रापासून साधारण ३० ते ४० नॉटिकल मैल अंतरावर असलेली नौका बुडाली होती. नौका समुद्रात बुडाल्यानंतर अनेक दिवस ती त्याच ठिकाणी पाण्यात होती.www.konkantoday.com




