महाराष्ट्र शासन भाषा संचालनालय मंत्रालय मुंबई यांच्याकडून मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन च्या ग्रंथालयाला विविध विषयावरील परिभाषा कोश भेट

महाराष्ट्र शासन भाषा संचालनालय मंत्रालय मुंबई यांच्याकडून मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन च्या ग्रंथालयाला विविध विषयावरील परिभाषा कोश भेट देण्यात आले. भाषा संचालनालयाचे भाषा संचालक श्री. अरुण गीते, उपसंचालक श्री. सूर्यवंशी, श्री. संदीप साबळे, श्री. नामदेव कोळी आणि मंत्रालयातील विविध अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कृषी शास्त्र परिभाषा कोश निर्मितीचे अध्यक्ष माननीय डॉ. भीमराव उल्मेक यांनी या उपक्रमाची स्तुती केली.
नुकतीच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन शिरगाव रत्नागिरी येथे कृषीशास्त्र परिभाषा कोश उपसमिती ची ९१ वी सभा संपन्न झाली. यानिमित्ताने ग्रंथालयास मानसशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, जीवशास्त्र, शिक्षणशास्त्र, कृषिशास्त्र इत्यादि परिभाषा कोश भेट म्हणून देण्यात आले. मराठी भाषा संवर्धन आणि विकासाचे विविध कार्य जोमाने सुरू असून या अंतर्गत कृषी शास्त्रातील ज्यात कृषी उद्यानविद्या मत्स्य अभियांत्रिकी अशा विविध शाखा अंतर्गतच्या विविध संज्ञांना सर्वात योग्य मराठी पर्याय शोधण्याकरता या समितीची स्थापना करण्यात आली असून लवकरच त्याचा कोश प्रसिद्ध होणार आहे.
भाषा संचालनालय महाराष्ट्र शासन यांनी आतापर्यंत विविध विषयावरील ३१ परिभाषा कोश प्रकाशित केले असून आतापर्यंत प्रकाशित झालेल्या परिभाषा कोशांचे नूतनीकरण आणि नवीन संज्ञांचा समावेश करण्याचे काम सुरू आहे. मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे प्राप्त परिभाषा कोशचा उपयोग विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना होईल, अशी अपेक्षा भाषा संचालक श्री. अरुण गीते यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button