महायुतीचा झंजावात विधान परिषदेच्या 16 जागा जिंकल्या, एका जागी अपक्ष


राज्यातील 17 पैकी 11 विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत 17 पैकी 16 जागा महायुतीने जिंकल्या आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आलेली नाही.
उलट महाविकास आघाडीची या निवडणुकीतील कामगिरी अत्यंत वाईट झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमदेवारांची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. कुणाला 5 मते मिळाली तर कुणाला शून्य मते मिळाली आहे. खासकरून देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचं दिसून आलं आहे. प्रत्येक मतदारसंघातील निकालाचा घेतलेला हा आढावा.

कुठे कुणाचा विजय –

सोलापूर – एकूण मतदार 616

राजेंद्र राऊत (भाजप) – 483

वसंतराव देशमुख (शरद पवार गट) – 118

जळगाव – एकूण मतदार 630

नंदकुमार महाजन (भाजप) – 577

शरद तायडे (ठाकरे गट) – 5

सांगली सातारा – एकूण मतदार 895

धैर्यशील कदम (भाजप) – 591

अभयसिंह जगताप (शरद पवार गट) – 295

नांदेड – एकूण मतदार 452

अमर राजूकर (भाजप) -339

कृष्णा आष्टीकर ( ठाकरे गट) – 84

भंडारा- गोंदिया – एकूण मतदार 457

अविनाश ब्राह्मणकर (भाजप) – 304

नरेश ईश्वरकर (मविआ पुरस्कृत) – 152

अमरावती – एकूण मतदार – 451

डॉ. प्रविण पोटे (भाजप) – 390

निलेश विश्वकर्मा (वंचित आघाडी) – 31

हर्षजित देशमुख (काँग्रेस) – 0

धाराशीव-लातूर- बीड – एकूण मतदार – 988

बसवराज पाटील (भाजप) -845

महेश देशमुख (काँग्रेस) – 124

छत्रपती संभाजीनगर- जालना- एकूण मतदार – 637

सुहास शिरसाट (भाजप) – 454

गणेश लोखंडे (ठाकरे गट) – 134

नागपूर – एकूण मतदार – 836

डॉ. राजीव पोतदार (भाजप) – 682

अतुल लोंढे ( काँग्रेस) – 130

परभणी – हिंगोली – एकूण मतदार – 466

सईद खान (शिवसेना) – 242

डॉ. विवेक नावंदर (ठाकरे गट) – 159

नाशिक – एकूण मतदार – 619

गोकुळ गिते (अपक्ष) – 357

नरेंद्र दराडे (शिवसेना) – 248

बिनविरोध –

प्राजक्त तनपुरे (भाजप) – अहिल्यानगर

अरुण लखानी (भाजप) – वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली

रविंद्र फाटक (शिवसेना) – ठाणे-पालघर

दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना) – यवतमाळ

विक्रम काकडे (राष्ट्रवादी) – पुणे

अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी) – रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button