
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. महाविद्यालयातील अधिकारी/कर्मचारी वर्ग, विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.




