पटसंख्येअभावी संगमेश्वरात जि.प.च्या दोन शाळा बंद


संगमेश्वर तालुक्यात पटसंख्येअभावी यावर्षी जिल्हा परिषदेच्या दोन शाळा बंद पडल्या आहेत. यामध्ये मोर्डे गवळीवाडी व डिंगणी बागवाणीकोंडचा समावेश असल्याची माहिती शिक्षण विभागातून प्राप्त झाली आहे.
एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाच्या बतीने आटोकाट प्रयत्न केले जात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी मोफत शालेय पुस्तके, मोफत गणवेश, पोषण आहार योजना राबविण्यात येत आहेत. मात्र जिल्हा परिषद शाळांना पटसंख्येचा फटका बसत आहे. पटसंख्ये अभावी दरवर्षी शाळा बंद पडत आहेत. त्यात पालकांचा लगतच्या शहरातील इंग्रजी शाळांकडे ओढा वाढल्याने जि. प. शाळांवर परिणाम होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button