निवे बुद्रुक गावचा सुपुत्र हर्षल दीपक जाधव वानखेडेवर झळकणार


ग्रामीण भागातील जिद्द, मेहनत आणि क्रिकेटप्रेम यांचे उत्तम उदाहरण ठरलेल्या संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक गावचा सुपुत्र हर्षल दीपक जाधव याने आणखी एक मोठी झेप घेतली आहे. आगामी प्रतिष्ठित २० मुंबई स्पर्धेसाठी त्याची ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट या संघात निवड झाली असून, या यशामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातून क्रिकेटचे धडे घेत व्यावसायिक क्रिकेटच्या व्यासपीठावर पोहोचणे हे कोणत्याही खेळाडूसाठी मोठे स्वप्न असते. हर्षलने मात्र आपल्या खेळाच्या जोरावर हे स्वप्न सत्यात उतरवले आहे. सातत्यपूर्ण कामगिरी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्याने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. हर्षलच्या या यशामागे त्याच्या आई-वडिलांचा मोठा त्याग आणि संघर्ष दडलेला आहे.
हर्षलची निवड ही केवळ वैयक्तिक यशाची कथा नसून ग्रामीण भागातील शेकडो युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा देणारी घटना ठरली आहे. टेनिस बॉल आणि लेदर बॉल ह क्रिकेटमधून आपली ओळख निर्माण करणार्‍या अनेक खेळाडूंना आता हर्षलच्या रूपाने नवा आदर्श मिळाला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button