
धरणसाठा तळाला; देवरूखकरांना एकदिवस आड पाणी पुरवठा
मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने देवरुख नगरपंचायतीने पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात गुरुवार, दि. १८ जूनपासून दिवसाआड एक पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली आहे.
यंदा जून महिन्याच्या मध्यापर्यंतही पावसाने हजेरी न लावल्याने धरणातील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन
वेगाने होत असून, उपलब्ध पिण्याच्या पाण्याचा साठा मर्यादित राहिला आहे. या पाश्वभूमीवर भविष्यातील संभाव्य पाणीट ंचाई टाळण्यासाठी नगरपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे.www.konkantoday.com




