दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिनोत्सवाचा दोन दिवस रंगणार सोहोळा


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या स्मृती जागविणारा ३५३ वा शिवराज्याभिषेक दिनोत्सव (दि. २६ व २७ जून २०२६) रोजी दुर्गराज रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्यावतीने आयोजित या सोहोळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांची विशेष उपस्थिती राहाणार असून राज्यभरातील शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपद महाडचे आमदार तथा राज्याचे रोजगार हमी फलोउत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत शेठ गोगावले हे भूषविणार आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button