तरूणाला फूस लावून पळविले, अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल


चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे एका तरुणाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरीता धनराज पवार (वय ३६, रा. सावर्डे बाजारपेठ) यानी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्धे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, अपहरित तरुण हा सरीता पवार यांच मुलगा असून ३ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी डेरवण येथील लिलीच्या बागेत गेला होता. भेट झाल्यानंतर संबंधित तरुणाला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून तेथून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button