
चिपळूण शहरातील गोवळकोटरोड प्रभाग २ अ मधून निवडून आलेल्या सफा गोठे यांचे नगरसेवक पद धोक्यात
चिपळूण शहरातील गोवळकोटरोड प्रभाग २ अ मधून निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या नगरसेविका सफा गोठे यांचे पद कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे. त्या ओबीसी गटातून निवडून आल्या आहेत. मात्र त्यांचा आंतरधर्मीय विवाह असल्याने नव्या कायद्यानुसार जात पडताळणी विभागाने त्यांचे ओबीसी जात पडताळणी प्रमाणपत्र नाकारले असल्याची माहिती पुढे आली आहे. याविरोधात त्यांनी कोल्हापूर खंडपीठाकडे धाव घेतली असून पुढील कारवाईला खंडपीठाने स्थगिती दिली आहे. यावर २ जुलैला सुनावणी होणार आहे.
गोठे यांची जन्मतः जात ओबीसी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे तसा जातीचा दाखला असून या दाखल्याच्या आधारे त्यांनी काही महिन्यांपूर्वी झालेली नगरपरिषदेची निवडणूक वरील प्रभागातून लढवून विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे नियमानुसार निवडणूक झाल्यापासून ६ महिन्याच्या आत त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.www.konkantoday.com




