चरवेलीत महिलांसाठी समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम उत्साहात

_____

रत्नागिरी : महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी आणि विविध सामाजिक विषयांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल आणि ग्रामपंचायत चरवेली यांच्या संयुक्त विद्यमाने चरवेली ग्रामपंचायत सभागृहात समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजसेविका सौ. श्रद्धा कळंबटे यांनी महिलांना विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. ग्राहक संरक्षण कायदा, किशोरवयीन मुलींच्या समस्या, महिलांचे आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता तसेच मुलांच्या भावना समजून घेण्याचे महत्त्व याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थित महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चरवेलीच्या सरपंच सौ. स्मिता लेले होत्या. त्यांनी लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल तसेच प्रमुख वक्त्या सौ. श्रद्धा कळंबटे यांचे आभार मानून अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये सामाजिक व कायदेशीर जागरूकता वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले.

यावेळी उपसरपंच काशीनाथ कदम, लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलचे अध्यक्ष अवधूत कळंबटे, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button