
कर्मचारी संपामुळे उपप्रादेशिक परिवहनच्या कामकाजावर परिणाम, प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था
मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागातील सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे कामकाजावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कर्मचारी संपावर गेल्यामुळे अधिकार्यांवर कर्मचार्यांची काही प्रमाणावर कामे सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे लोकांची गैरसोय होवू नये याची दक्षता घेण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी सांगितले आहे.
दि. १६ जूनपासून सुरु झालेल्या या संपामध्ये रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागातील सर्व ११ कर्मचार्यांनी संपात सहभाग घेतला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्धार कर्मचार्यांकडून करण्यात आला आहे.
www.konkantoday.com




