️साताऱ्यात भीषण दुर्घटना! वाहन दरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू; 5 जखमी!

Satara road Accident : सातारा तालुक्यातील परळी घाट परिसरात शुक्रवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. परळी घाट परिसरात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली असून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घराचे साहित्य भरुन जाताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

साताऱ्यात मोठी दुर्घटना, ट्रॅक्टर दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारच्या परळी घाटात का घरगुती साहित्याने भरलेला एक ट्रॉली ट्रॅक्टर अचानक ५० फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात एका चिमुकलीसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. घराचे साहित्य घेऊन जात असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित कुटुंबा आपल्या घरातील सर्व साहित्य ट्रकमध्ये भरून निघाले होते. कासरतळे येथील रस्त्याच्या कडेला ट्रक उभा असताना अचानक जमिनीचा अंदाज न आल्याने ट्रॉली थेट दरीत कोसळली. या वाहनात साहित्यासह काही लोकही बसले होते. अपघाताची भीषणता इतकी होती की, जागीच पाच जणांनी प्राण गमावले.

सितारामा आडागळे (रा कामठी परळी ता सातारा), कल्पना सागर आवळे (वय 35, रा कवठे, सुरूर वाई) गार्गी सागर आवळे (वय 6 ) लिलाबाई उत्तम अडागळे (वय 60 रा. कामठी परळी) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ट्रेकर्स आणि बचाव पथकांनी धाव घेतली असून, रात्री उशिरापर्यंत दरीतून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button