शासकीय कर्मचाऱ्यांच्या हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती’-, मंत्री उदय सामंत


,महाराष्ट्र सरकारच्यावतीने शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी २८ जूनला हिंदी भाषेची परीक्षा घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेमुळे राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार होती.मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि इतर काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी भाषा वादाला तोंड फुटण्याची शक्यता होती.

या घडामोडीनंतर आता शासकीय कर्मचाऱ्यांची घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भातील माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा असताना हिंदी भाषेची सक्ती का? यामागील कारण काय? असे अनेक सवाल विचारले जात होते. त्यानंतर अखेर सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

‘मला माध्यमांमधूनच कळलं की मराठी भाषा संचालनालयाकडून अशा प्रकारची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर मी आता आमचे प्रधान सचिव किरण कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. हिंदी भाषेची परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता त्या परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी सांगितली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button