लक्ष्मी ऑर्गनिक्स विरोधातील आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे

खेड : कोकण नगरी संघर्ष समिती आणि लोटे पर्यावरण संरक्षण समितीच्या वतीने आज पुणे येथे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची भेट घेण्यात आली. लोटे परिसरातील प्रदूषण, पर्यावरणीय परिणाम आणि लक्ष्मी ऑर्गनिक्स विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या भेटीत आंदोलनासंदर्भातील विविध कायदेशीर बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आंदोलनाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सहकार्याची ग्वाही न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी दिली. तसेच, आंदोलन अधिक व्यापक आणि संघटित करण्याचे आवाहनही त्यांनी कोकणातील जनतेला केले.
न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्या भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. पर्यावरण व जनहिताच्या मुद्द्यावर कोकणातील नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला अशोकराव जाधव, उदय घाग, रवींद्र गोवळकर, जितेंद्र आंब्रे, सुबोध सावंत, देसाई यांच्यासह समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आंदोलन पुढील टप्प्यात अधिक प्रभावीपणे नेण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
“लोटे परिसरातील जनतेच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. या लढ्यात मी कायदेशीर पातळीवर पूर्ण सहकार्य करणार आहे,” अशी भूमिका माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button