रायगड जिल्ह्यातील पाली-खोपोली मार्गावर कार टेम्पो अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील एकाचा मृत्यू


रायगड जिल्ह्यातील पाली-खोपोली मार्गावर पेडली हद्दीत झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. रविवारी घडलेल्या या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.प्राथमिक माहितीनुसार, कारमधील प्रवासी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून मुंबईकडे जात होते. पेडली परिसरात आल्यानंतर कार चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला कारची जोरदार धडक बसली. चालकाला डुलकी लागल्याने ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. अपघातात कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल, कामोठे-पनवेल येथे दाखल करण्यात आले आहे. तर एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीचे शव जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे.

या अपघातात रोहन साळुंखे राहणार खेड यांचा मृत्यू झाला आहे. तर प्रकाश हजारे राहणार शहापूर ठाणे आणि अविनाश पडवळ राहणार टिटवाळा हे दोघे गंभीर जखमी झाले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button