राजापूर तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथील रिक्षा चालकाचा चालत्या रिक्षात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


राजापूर तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथील रिक्षा व्यावसायिक ताजू वाडेकर (५५) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ओणी येथे प्रवासी सोडण्यासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. मात्र शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि सेवेचा धर्म पाळला.
गोठणे दोनिवडे येथील रहिवासी असलेले वाडेकर पूर्वी फ्रिज मेकॅनिक म्हणून परदेशात नोकरीला होते. मात्र गावाकडच्या ओढीने काही वर्षांपूर्वी ते परतले. सुमो आणि रिक्षाच्या माध्यमातून त्यांनी केवळ व्यवसाय केला नाही तर माणसे जोडली. नेहमी उलटी टोपी घालण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळे ते संपूर्ण पंचक्रोशीत ’उलटी टोपी’ याच नावाने ओळखले जात.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button