
रत्नागिरी तालुक्यातील मौजे चाफे येथील भूमीहिन शेतकर्यांच्या जमीन वाटप घोटाळ्याची जिल्हाधिकार्यांमार्फत चौकशी
रत्नागिरी तालुक्यातील मौजे चाफे येथील १९८८ भूमिहीन शेतकर्यांना वाटप करण्यात आलेल्या अतिरिक्त जमिनीच्या व्यवहारात मोठी अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत, राज्य शासनाने या प्रकरणाच्या पुनरीक्षणाचे आदेश दिले आहेत. महसूल व वन विभागाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २५७ मधील तरतुदीनुसार या प्रकरणाची सखोल चौकशी करून निर्णय घेण्याचे अधिकार रत्नागिरी जिल्हाधिकार्यांना बहाल केले आहेत. चाफे (धनगरवाडा) येथील रहिवासी
सुभाष अबू कोकरे यांनी ३ जून २०२५ रोजी महसूल मंत्र्यांकडे एक तक्रार अर्ज दाखल केला होता. १९८८ मध्ये शासनाने भूमिहीन शेतकर्यांना ज्या जमिनीचे वाटप केले होते, त्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. या तक्रारीची दखल घेत महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार कोकण विभागीय आयुक्तांनी अपर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष चौकशी समिती नेमली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात जमीन वाटप प्रक्रियेत कायदेशीर त्रुटी आणि अनियमितता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
www.konkantoday.com




