रत्नागिरीतील पेट्राेल पंपांवर ’पांवर’ पेट्राेल देण्या येत असल्याने वाहनधारकांना आर्थिक फटका


रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पेट्राेल पंपांवर गेल्या काही दिवसांपासून वाहनधारकांना ’साधं पेट्राेल उपलब्ध नाही, पाॅवर पेट्राेलच मिळेल’ असे सांगितले जात असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त हाेत आहे. नियमित पेट्राेलऐवजी प्रीमियम अथवा पाॅवर पेट्राेल घेण्याची सक्ती केली जात असल्याचा आराेप वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
सामान्य दुचाकीस्वार, नाेकरदार आणि कष्टकरी वर्ग नेहमीच्या वापरासाठी साध्या पेट्राेलला प्राधान्य देताे. मात्र अनेक पेट्राेल पंपांवर साधं पेट्राेल संपल्याचे सांगितले जात असून थेट पाॅवर पेट्राेल भरले जात असल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जात आहे. घाईत असलेल्या वाहनचालकांकडे दुसरा पर्याय नसल्याने त्यांना नाईलाजाने महागडे पेट्राेल घ्यावे लागत आहे. यामुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक हाेत असल्याची भावना व्यक्त हाेत आहे.
सध्या साध्या आणि पाॅवर पेट्राेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे चार ते पाच रुपयांचा फरक आहे. त्यामुळे 10 लिटर पेट्राेल भरणाèया दुचाकीस्वाराला 40 ते 50 रुपये अतिरिक्त माेजावे लागत आहेत. चारचाकी वाहनधारकांच्या बाबतीत हा अतिरिक्त खर्च आणखी वाढत आहे. आधीच वाढत्या इंधनदरांनी त्रस्त असलेल्या ग्राहकांना या प्रकाराचा फटका बसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button