रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या शुभहस्ते माजी विद्यार्थी संघ, मराठा मंदिर अ.के. देसाई हायस्कूल रत्नागिरी आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

शुक्रवार दिनांक 22 / 05 / 2026 रोजी माजी विद्यार्थी संघ, मराठा मंदिर अ. के.देसाई हायस्कूल रत्नागिरी आयोजित तालुकास्तरीय नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व मराठा मंदिर संस्थेचे आद्य संस्थापक कै.बाबासाहेब गावडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ अर्पण करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.या उदघाटन समारंभास  प्रभाग क्रमांक 5 च्या नगरसेविका व महिला बालकल्याण समिती उपसभापती सौ.पूजा दीपक पवार, प्रसिद्ध उद्योजक श्री.अथर्व गजेंद्रशेठ पाथरे उपस्थित होते.
      प्रशालेच्या मुख्याध्यापिका  सौ.अंजली पिलणकर यांनी उपस्थित मान्यवर,पंच,गुणलेखक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांचे शोभेचे झाड देऊन स्वागत केले. या उदघाटन समारंभास सेवानिवृत्त शिक्षक श्री. विनोद गावखडकर, माजी विद्यार्थी संघ पदाधिकारी श्री. रणजीत सुवारे, श्री. अच्युत गजबिये, श्री. सुदेश निवळकर, श्री. आकाश परीट, श्री. योगेश कोरगावकर, श्री. प्रणित मेस्त्री, श्री. मंदार आचरेकर, श्री. प्रणव राऊळ आणि शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
  रविवार दिनांक 24 / 05 /2026 रोजी सायंकाळी 07 ते 11 या वेळेत स्पर्धेच्या सेमी फायनल आणि फायनल चे सामने होणार असून त्याच वेळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button