मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण, संगमेश्वरसह उड्डाणपुलांची कामे अंतिम टप्प्यात


मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्गाच्या चाैपदरीकरणाची प्रतीक्षा आता संपत आली असून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या उड्डाणपुलांची आणि माेठ्या पुलांची कामे अंतिम टप्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या चिपळूण शहरातील नवीन संरचनेच्या उड्डाणपुलाचे काम तब्बल 98.7टक्के पूर्ण झाले आहे.
उर्वरित काम आगामी जून 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात काेकणवासियांचा आणि पर्यटकांचा प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित हाेणार आहे. काेंडी महामार्गावरील वाहतुकीची ाेडण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हे उड्डाणपूल मैलाचा दगड ठरणार आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत सुरू असलेल्या पुलांच्या कामांना कमालीचा वेग आला असून, राष्ट्रीय महामार्ग ही कामे प्राधिकरणाकडून पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला पूर्ण करण्याचे काटेकाेर नियाेजन करण्यात आले आहे. चिपळूण उड्डाणपूल 98.7 टक्के पूर्ण असून अंतिम मुदत जून 2026 आहे. संगमेश्वर पुलाचे काम मे अखेर पूर्ण हाेणार आहे.
संगमेश्वर येथील महत्त्वाच्या पुलाचे काम सध्या 98 टक्के पूर्ण झाले आहे. केवळ दाेन टक्के काम शिल्लक आहे हे काम चालू महिना म्हणजेच मे 2026 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. दुसरीकडे, बावनदी पुलाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button