
मासळीच्या साठ्याचे संवर्धनासाठी पावसाळी मासेमारी १ जूनपासून बंदी
मासळीच्या साठ्याचे संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित व वित्ताच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य शासनाने यंदाची पावसाळी मासेमारी बंदी जाहीर केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार, १ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत महाराष्ट्राच्या सागरी किनार्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी राहणार आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे की, बंदी कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जाणार्या नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व मच्छिमार, नौकामालक, तांडेल आणि खलाशी यांनी शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.www.konkantoday.com




