माजी आमदार रमेशभाई कदम नाराज, पक्षाकडून अपमानास्पद वागणूक; लवकरच राजकीय भूमिका जाहीर करणार.


चिपळूण राजकारणातून मी अजिबात निवृत्ती किंवा संन्यास घेतलेला नसून कार्यकर्ते आणि जनतेसाठी अखंडपणे राजकारणात सक्रिय राहाणार आहे. आगामी काळात लवकरच आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून विचारपूर्वक भूमिका जाहीर करणार आहे. तोपर्यंत कोणीही विचलित न होता कायम माझ्या पाठीशी उभे राहून आजवर दिली तशीच भविष्यातही साथ द्यावी अशी भावनिक साद चिपळूणचे माजी आमदार श्री. रमेशभाई कदम यांनी घातली.
यावेळी श्री. रमेशभाईंनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. ते म्हणाले की, १९७४ सालापासून मी शरद पवार साहेबांसोबत एकजुटीने काम करतोय. १९९९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतरही चिपळूणमधून मी स्वतः तसेच माटे साहेब, निकम साहेब तर रत्नागिरीतून कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा गुहागरमधून नंदूशेठ पवार आदी ज्येष्ठ मंडळींसोबत पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले. मधल्या काळात पक्ष फुटला आणि दोन गट तयार झाले तरीही आम्ही पवारसाहेबांची साथ सोडली नाही. साहेबांबद्दल आजही मनात आदराची आणि श्रद्धेची भावना आहे. मात्र मधल्या काळात काही कटू अनुभव आले, त्यामुळे नाईलाजाने राजीनामा द्यावा लागला असा स्पष्ट खुलासा त्यांनी केला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button