
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा31 मे रोजी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
रत्नागिरी, दि. 25 ) : पटवर्धन हायस्कूल व फाटक हायस्कूल, रत्नागिरी या परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी, परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षेच्या दिवशी 31 मे 2026 पर्यंत सकाळी 8 पासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची परीक्षा जिल्ह्यातील पटवर्धन हायस्कूल व फाटक हायस्कूल, रत्नागिरी या केंद्रावर 31 मे 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजता या कालावधीत घेणार असून, परीक्षा केंद्राचे 100 मीटरच्या परीसरात अपर जिल्हादंडाधिकारी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम 163 प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये जिल्हयातील पटवर्धन हायस्कूल व फाटक हायस्कूल या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परीसरात परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच सदरील परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षेच्या दिवशी 31 मे 2026 रोजी पर्यंत सकाळी 8 वा. पासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशांची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील.
हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी / कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगरानी करणारे अधिकारी / पोलीस अधिकारी यांचे बाबत त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्य पार पाडणाच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील.
या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.




