
मराठा मंदिर, अ.के.देसाई हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
शनिवार दिनांक 02 /05 /2026 रोजी मराठा मंदिर अ.के. देसाई हायस्कूल रत्नागिरी प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. स्नेह मेळाव्यासाठी अनेक माजी विद्यार्थी, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. नाव नोंदणी व नाश्ता झाल्यानंतर मेळाव्याचे उद्घाटन प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. पुरुषोत्तम बोरकर सर यांनी फित कापून केले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी पुष्प पाकळ्यांचा वर्षाव करीत सर्व आजी - माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रेमपूर्वक स्वागत केले. स्नेह मेळाव्यास उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर मराठा मंदिर संस्थेचे आद्य संस्थापक कै. बाबासाहेब गावडे आणि विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते सर्व माजी मुख्याध्यापक,सेवानिवृत्त शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्वागत करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली पिलणकर यांनी आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून उपस्थितांचे स्वागत केले. एक माजी विद्यार्थी म्हणून स्वानुभव कथन करून प्रशालेचा विकास व अस्तित्वाबाबत आपली तळमळ व्यक्त केली आणि सर्वांना शाळेच्या उत्कर्षामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सहा.शिक्षक श्री सचिन मिरगल यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा आपल्या मनोगतातून सादर केला. सहा.शिक्षक श्री.संतोष गार्डी यांनी मागील मेळाव्याचा जमा खर्च सादर केला.
*मी असा घडलो* या कार्यक्रमांतर्गत माजी विद्यार्थी श्री. रणजीत सुवारे यांनी शाळेने त्यांच्या शालेय जीवनामध्ये केलेल्या सुसंस्काराबाबत कृतज्ञता व्यक्त केली .माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे सूत्रसंचालन करणारे प्रशालेचे माजी विद्यार्थी , रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि सुप्रसिद्ध निवेदक व सूत्रसंचालक मा. श्री अभिजीत गोडबोले यांनी आपल्या मराठा मंदिर अ.के. देसाई हायस्कूलच्या विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला आणि आज आपण जे काही यश मिळविले आहे त्याचे सर्व श्रेय प्रशालेला दिले आणि शाळेच्या मदतीसाठी कटीबद्ध असल्याचे आश्वासन दिले.सौ.सनम देसाई व श्री.अविनाश बाईत यांनीही शालेय जीवनातील आपल्या सुखद आठवणी सांगितल्या. माजी मुख्याध्यापक श्री.अशोक पाखरे,श्रीम.प्रज्ञा दळी, सेवानिवृत्त शिक्षिका श्रीम.स्नेहल मंद्रुपकर,गो.जो.महाविद्यालयाचे माजी उप प्राचार्य डॉ. राजीव सप्रे या सर्वांनी आपल्या मनोगतांतून मेळाव्यास शुभेच्छा व प्रशालेच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
स्नेह मेळाव्यास सर्व माजी मुख्याध्यापक - श्री.पुरुषोत्तम बोरकर, श्री.अशोक पाखरे,श्रीम.प्रज्ञा दळी, सौ.शिवली शितुत, माजी पर्यवेक्षिका सौ. शैलजा लिमये ,सेवाभावी वृत्तीने इयत्ता दहावीच्या च्या विद्यार्थ्यांना गणित विषयाचे कोणतेही मानधन न घेता मार्गदर्शन करणारे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य श्री. राजीव सप्रे, सेवानिवृत्त शिक्षक श्री.कोले सर, श्रीम.नीता देशपांडे, सौ. मानसी तारे , श्रीम. स्नेहल मंद्रुपकर, श्री. विनोद गावखडकर, श्री. सचिन मोहिते, सौ. सुषमा सावंत,श्रीम. मंदाताई, सेवानिवृत्त ग्रंथपाल सौ,.सुनंदा मेश्राम यांची उपस्थिती होती.
श्री. सुतार सर, श्री. शंभूराजे गाटे सर , सौ.मंजिरी साळवी मॅडम, श्रीम.प्राजक्ता सावंतदेसाई मॅडम, सौ.काळे मॅडम,श्री.तामोरे सर,श्री.शेखर सर,श्री.जाधवमामा, श्री.सुर्वे भाऊ, श्री.मोरे सर, श्री.किरण गोजारे सर, श्री.एन के.पाटील सर, श्री.करे सर,सौ. मंगल पाटील मॅडम आणि इतर जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी या कार्यक्रमासाठी त्या कळवल्या आहेत.
2026 - 27 या वर्षीचा माजी विद्यार्थी मेळावा जानेवारी 2027 च्या दुसऱ्या रविवारी घेण्याचे निश्चित करण्यात आले. स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघाचे सदस्य श्री.रणजीत सुवारे,श्री.सुदेश निवळकर,श्री.अभिजीत गोडबोले, श्री. योगेश कोरगावकर, श्री.आकाश परीट, श्री.प्रणित मेस्त्री, श्री.अनिकेत जाधव,श्री.अच्युत गजभिये, कु.आलीशा जाधव, कु.रिया मांडवकर, श्री.शाकिब मुल्ला,श्री.सुशांत पवार,श्री.जीवन जाधव, यांनी बहुमोल प्रयत्न केले. श्री. जयसिंग लोहार, सौ. वृषाली सावंत व शाळेतील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मेळावा यशस्वीतेसाठी सहकार्य केले. प्रशाला या सर्वांची आभारी आहे.




