धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट!


पुण्यातील हडपसर परिसरात कामधेनु इस्टेटमधील एका प्रतिष्ठित सुपर स्पेशालिस्ट खासगी हॉस्पिटलमध्ये आज मोठी घटना घडली. हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये एक जीवंत बॉम्ब आढळल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीएस) तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

प्राप्त माहितीनुसार, टॉयलेटमध्ये सापडलेल्या या बॉम्बमध्ये सात तासांचा टायमर सेट केलेला होता. बीडीएस पथकाने अत्यंत सावधगिरीने तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बॉम्बची तपासणी पूर्ण केली आणि त्यास सुरक्षित ठिकाणी हलवले. ही घटना हॉस्पिटलच्या आत घडल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी यांच्यात प्रचंड गोंधळ उडाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील हालचाली तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात आल्या.

हॉस्पिटल सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह

दररोज शेकडो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ये-जा असणाऱ्या या मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये जीवंत बॉम्ब आढळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता आणि सक्षमता यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. अशा संवेदनशील ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणी ठेवला बॉम्ब? विविध शक्यता

या जीवंत बॉम्बची घटना कोणी आणि का घडवली, याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. यामागे एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाचा राग, उपचारातील असंतोष, बिलावरील वाद किंवा इतर कोणते आर्थिक-वैयक्तिक कारण असू शकते का, अशा अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. परिसरात अफवांचे पीक पिकले आहे.

तपास सुरू

पोलीस आणि संबंधित सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, हॉस्पिटलमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची नोंद, त्यांची हालचाल आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे गुन्हेगारास लवकरात लवकर पकडण्याचे प्रयत्न सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button