राजापूरमध्ये एकाच दिवशी दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या


राजापूर तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी दोन तरूणांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. अक्षय मंगेश डुकळे (२८, रा. रुंढे आडीवरे) व राहूल राजेश माटल (२१, रा. कळसवली कोष्टेवाडी) अशी आत्महत्या करणाऱ्या तरूणांची नावे आहेत.
यातील एका घटनेत रूंढे, आडीवरे येथील अक्षय मंगेश डुकळे याने शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण गावातील लग्नाची वरात पाहण्याकरीता गेलेले असताना दारूचे नशेत घरातील ओठीच्या बाजूला असलेल्या खोलीतील लोखंडी चॅनलच्या वाश्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. कुटुंबियांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्याला उपचारा करीता धारतळे प ाथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारा करीता दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मयत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी मंगेश वासुदेव डुकळे यांनी नाटे पोलिस स्थानकात खबर दिली आहे.
तर दुसऱ्या घटनेत कळसवली कोष्टेवाडी येथील राहूल राजेश माटल या २१ वर्षीय तरूणाने शनिवारी सकाळी १०.३० ते १२.३० वाजताच्या दरम्याने कोणत्यातरी अज्ञात कारणाने राहत्या घरातील हॉलमधील लोखंडी बारला असलेल्या अँगल ला साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणाचा तपास राजापूर पोलीस करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button