जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते सक्षमीकरणाचा ’मास्टर प्लान’ -सभापती विलास चाळके


रत्नागिरी जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधींचे शासन येताच ग्रामीण विकासाच्या चक्राला गती देण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा कायापालट आणि रस्त्यांची दुरावस्था दूर करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती उपाध्यक्ष तथा बांधकाम व आरोग्य समिती सभापती विलास चाळके यांनी दिली आहे.
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान एक एमबीबीएस डॉक्टर सध्या जिल्ह्यात एकूण ६८ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत, मात्र त्यांपैकी केवळ २० ठिकाणीच एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध असल्याने ग्रामीण जनतेची मोठी गैरसोय होत आहे. ही तफावत दूर करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ६८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किमान एक तरी एमबीबीएस डॉक्टर नियुक्त करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. या संदर्भात आवश्यक डॉक्टर भरतीची अधिकृत जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली असून, लवकरच ही पदे भरून ओपीडी यांनी व्यक्त केला. (बाह्यरुग्ण विभाग) अधिक सक्षम केली जाईल, असा विश्वास चाळके बंद केलेल्या ’महालॅब’ तात्काळ सुरू करण्याची आग्रही मागणी आरोग्य सुविधेत येणार्‍या तांत्रिक अडचणी दूर करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button