चिपळूण शहरासह तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ऐन पावसात शाळांची दुरूस्ती


चिपळूण शहरासह तालुक्यात जिल्हा परिषदेच्या काही माेजक्याच मराठी शाळा आजही तग धरुन आहेत. मात्र बèयाच शाळा नादुरुस्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दरवर्षी जिल्हा परिषदेकडून लाखाे रुपये खर्चकरून शाळांची दुरुस्ती केली जाते. त्यानुसार याहीवर्षी काही शाळांची दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारांना यापूर्वीच देण्यात आले आहेत. मात्र या कामात हलगर्जीपणा हाेत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील वडनाका परिसरात काही खाेल्यांची कन्याशाळा आहे. मात्र पटसंख्येअभावी सर्वच खाेल्यांचा वापर हाेताना दिसत नाही. त्यामुळे काही माेजक्याच खाेल्यांची दुरुस्ती केली जात आहे. त्यानुसार ऐन पावसाच्या ताेंडावर ही दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार ठेकेदाराने छत खाेलून ठेवले आहे. त्यामुळे गेले काही दिवस या खाेल्यांमध्ये पाऊस पडत आहे. मुळातच या खाेल्या नादुस्त आहेत. त्यातच पावसाचे पाणी साचून त्यांची आणखीनच वाट लागत आहे. त्यामुळे पं. स. अधिकाèयांनी जलद गतीने काम करण्याच्या सूचना ठेकेदाराला द्याव्यात अशी मागणी हाेत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button