
चिपळूण तालुक्यातील सती नाका येथील दुकानफोडी प्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळल्या.
चिपळूण तालुक्यातील सती नाका येथील श्री सुकाई रेफ्रिजरेशन दुकान फोडून चोरट्याने १ लाखाचे साहित्य चोरल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडीस आली होती. पोलिसांनी काही तासातच याचा यशस्वी तपास करून याप्रकरणी २० ते २१ वयोगटातील स्थानिक तिघा तरुणांच्या मुसक्या आवळल्या. मंगळवारी त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता त्या तिघांना न्यायालयीन कोठडी
सुनावण्यात आली. ऋषिकेश दगडू कदम (२१, अनारी), आदित्य जालिंदर पवार (२१, वडार कॉलनी), प्रणय रमाकांत जाधव (२०, कान्हे) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याबाबतची फिर्याद प्रदीप काशिनाथ कदम (४५, वेहळे) यांनी दिली आहे.
www.konkantoday.com




