गुहागर एसटी प्रवासात महिलेच्या पिशवीतून ४ लाखांचे दागिने लंपास


मुंबई ते गुहागर प्रवासादरम्यान बॅगेमध्ये ठेवलेले ३ लाख ८४ हजार ८०० रुपये किमतीचे दागिने अज्ञाताने चोरून नेल्याची फिर्याद गुहागर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मूळच्या गुहागरमधील रहिवासी असलेल्या मैथिली मिलिंद आरेकर (५१) यांनी ही चोरीची फिर्याद दाखल केली आहे. त्या रविवारी रात्री ९.१५ वाजता वरळी-मुंबई वीर नरीमन रोड येथील राहत्या घरातून गुहागर येथील आपल्या राहत्या घरी येण्यासाठी प्रवास करत होत्या. रविवारी घरातून निघताना कपड्याच्या पिशवीमध्ये साडीच्या घडीत वामन हरी पेठे ज्वेलर्स नावाच्या फिक्कट जांभळ्या रंगाच्या पाकीटामध्ये त्यांनी १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे ५ तोळ्याचे ३८ इंच सोन्याचे मोठे मंगळसूत्र, २ लाख ५२ हजार रुपये किंमतीच्या चार सोन्याच्या बांगड्या, २८०० रुपये किंमतीचा जास्वंदीच्या फुलांची नक्षी असलेला सोन्याचा कर्णफुलांचा जोड असे एकूण ३ लाख ८४ हजार ८०० रुपये किंमतीचे दागिने ठेवले होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button