गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासाने यशाची नवी उंची गाठली


कोकणच्या पर्यटनाचा ’मुकुटमणी’ असलेल्या गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासाने यशाची नवी उंची गाठली आहे. गेल्या पाच वर्षांत या केंद्राने आपल्या उत्पन्नात दुपटीहून अधिक वाढ करत चक्क १० कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. श्री गणपतीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसह निसर्गप्रेमी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला मिळत असल्याचे अधिकृत ओकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
केवळ उत्पन्नच नाही, तर येथे मुक्काम करणार्‍या पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. २०२१ मध्ये ३२ हजारांवर असलेली पर्यटकांची संख्या आता ५७ हजार ६४ वर पोहोचली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या थंडीच्या महिन्यात तर येथे पर्यटकांची अक्षरशः जत्रा भरते. डिसेंबर २०२५ मध्ये एकाच महिन्यात ६ हजार ८० पर्यटकांनी निवास केला, तर उन्हाळी सुट्टीत मे महिन्यातही ५ ते ७ हजार पर्यटक येथे मुक्काम करत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button