खेड शहरात नदीच्या पाण्यात बुडणाऱ्या वृद्ध महिलेला तरुणांने वाचवले


रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातून खारी गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील पुलाखाली मंगळवार दि. २६ रोजी एक थरारक घटना घडली. एका वृद्ध महिलेचा पाण्यात बुडून जीव जाण्याची वेळ आली असताना स्थानिक युवक शिवम शिबे यांनी प्रसंगावधान राखत धाडसी बचावकार्य करून तिचा जीव वाचवला.संबंधित वृद्ध महिला पुलाखालील पाण्यात बुडत असल्याचे शिवम शिबे यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी क्षणाचाही विलंब न करता खोल नदीपात्रात उडी घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी महिलेपर्यंत पोहोचून तिला सुरक्षित बाहेर काढले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button