कोळथरे येथील सुशील सूर्यकांत सावंत यांची दापोली राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदी निवड…

◾दापोली :- दापोली तालुक्यातील जयभवानी मराठा समाज कोळथरे येथील गुणी, कार्यक्षम आणि समाजकार्यात सक्रिय असलेले युवा कार्यकर्ते सुशील सूर्यकांत सावंत यांची श्री. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दापोली तालुका युवक अध्यक्षपदी निवड झाल्याने कोळथरे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून जयभवानी मराठा समाजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सुशील सावंत यांनी सामाजिक, शैक्षणिक तसेच युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. युवकांना संघटित करून पक्ष बळकटीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी समाजातील मान्यवर, पदाधिकारी, महिला वर्ग तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सुशीलकुमार सावंत यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच युवकांच्या न्याय्य प्रश्नांसाठी सातत्याने काम करणार आहे,” असे मनोगत सुशील सावंत यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button