
कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण-दिवा मेमू उद्यापासून सेवेत अनारक्षित
उन्हाळी सुट्टी हंगामासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेली चिपळूण-दिवा अनारक्षित मेमू स्पेशल १ मे पासून कोकणवासियांच्या सेवेत दाखल होणार आहे. ’विकेंड’ला धावणार्या स्पेशलच्या ७ जूनपर्यंत फेर्या धावणार असल्याने गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. ०११६०/०११५९ क्रमांकाची चिपळूण-दिवा मेमू स्पेशल आठवड्यातून शुक्रवार, शनिवार, रविवारी धावेल. चिपळूण येथून सायंकाळी ३.३० वाजता सुटणारी मेमू त्याचदिवशी रात्री ११.१० वाजता दिवा येथे पोहचेल, असे रेल्वेतर्फे कळवण्यात आले.
www.konkantoday.com




