कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी सुरत-मंगळुरू स्पेशल आता नियमित द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस


कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून, गाडी क्रमांक ०९०५७ /०९०५८ सुरत-मंगळुरू जंक्शन स्पेशल गाडी आता नियमित द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस म्हणून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी दि. ३ जूनपासून सुरत येथून आणि ४ जूनपासून मंगळुरू जंक्शन येथून नियमित धावणार आहे.
गाडी क्रमांक १९०५७ सुरत-मंगळुरू जंक्शन द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस दर बुधवारी आणि रविवारी सुरत येथून सायंकाळी ७:३५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सायंकाळी ७:४५ वाजता मंगळुरू जंक्शन येथे पोहोचेल. गाडी क्रमांक १९०५८ मंगळुरू जंक्शनसुरत द्विसाप्ताहिक एक्सप्रेस दर गुरुवारी आणि सोमवारी रात्री १०:३० वाजता मंगळुरू जंक्शन येथून सुटून दुसर्‍या दिवशी रात्री ११:४५ वाजता सुरत येथे पोहोचणार आहे.
ही गाडी उधना जंक्शन, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर थांबा घेणार आहे.
या एक्स्प्रेसची रचना एकूण २० डब्यांची असून, त्यामध्ये १ एसी टू-टियर, ७ एसी थ्री-टियर, ६ स्लीपर, ४ जनरल आणि २ एसएलआर/डी डब्यांचा समावेश आहे. कोकण मार्गावरील वाढती प्रवासी संख्या आणि पर्यटन हंगाम लक्षात घेता या गाडीच्या नियमितीकरणामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button