कुवारबाव साईनगर येथील सूरज झोरे खुनातील कोयता पोलिसांकडून जप्त


रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर येथील सूरज झोरे खून प्रकरणात पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचा पुरावा लागला आहे. खून करण्यासाठी वापरण्यात आलेला कोयता शहर पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, खून प्रकरणात वापरलेला कोयता सुरज झोरे याच्या रक्ताने माखलेल्या स्थितीत आढळून आला आहे. या कोयत्यावरील रक्ताच्या नमुन्याची तपासणी पोलिसांकडून केली जाणार आहे. त्यासाठी हा कोयता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविला जाण्याची शक्यता आहे.
सुरज राजाराम झोरे (२५, रा. विरार) याचा २१ मे रोजी रात्री ९.३० वाजता साईनगर कुवारबाव येथे कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी सोहम एकनाथ म्हात्रे (१८, रा. शांतीनगर रसाळवाडी-रत्नागिरी), अभिषेक देवानंद राठोड (२२, आदिनाथनगर समोरील झोपडपट्टी, रत्नागिरी) व नजीबुल शेख उर्फ सोनू (रा. शांतीनगर रसाळवाडी, रत्नागिरी) या तिघा मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करत अटक केली होती. पोलिसांकडून तिघा संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.
या चौकशीदरम्यान संशयित आरोपींनी कोयत्याबाबत माहिती उघड केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणाहून गुन्ह्यात वापरलेला कोयता हस्तगत केला. तसेच हा कोयता आरोपींनी कुणाकडून आणला याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. या कोयत्याने सूरजवर तब्बल ३१ वार करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button