
आता टोल नाक्यावर आता सुसज्ज कृषी मॉल उभारण्याचा शासनाचा निर्णय
राज्यातील शेतकर्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने एक अभिनव योजना आखली आहे. राज्यातील सर्व प्रमुख रस्ते आणि महामार्गावरील टोल नाक्यांच्या परिसरात आता सुसज्ज कृषि मॉल उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकर्यांना आपला माल विकण्यासाठी लांबच्या बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागणार नाही, तर महामार्गावरून प्रवास करणार्या हजारो प्रवाशांना थेट शेतातून आलेली ताजी फळे आणि आणि भाजीपाला खरेदी करता येणार आहे. अनेकदा ग्रामीण भागातील शेतकर्यांचा आपला शेतमाल कृषि उत्पन्न बाजार समिती किंवा शहरांमधील बाजारपेठेत नेण्यासाठी मोठा वाहतूक खर्च करावा लागतो. तसेच प्रवासात बराच वेळ आणि श्रम वाया जातात, आता टोल नाक्यांवरच विक्रीची सोय उपलब्ध झाल्याने, शेताच्या जवळ हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. यामुळे शेतकर्यांचा वाहतूक खर्च शून्यावर येईल आणि नफ्यात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे
www.konkantoday.com




