अमेरिकेत खळबळ! ट्रम्प घरात असताना ‘व्हाइट हाउस’बाहेर गोळीबार; सीक्रेट सर्व्हिसच्या कारवाईत हल्लेखोर ठार


अमेरिकेची राजधानी वाशिंग्टन डीसी येथील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘व्हाइट हाउस’ कॉम्प्लेक्सच्या बाहेर रविवारी संध्याकाळी गोळीबाराची एक धक्कादायक घटना घडली.एका अज्ञात संशयित बंदूकधाऱ्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत गोळीबार केला. मात्र, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ‘अमेरिकन सीक्रेट सर्व्हिस’च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या जवाबी कारवाईत हा हल्लेखोर जागीच ठार झाला. न्यूज एजन्सी ‘रॉयटर्स’ आणि ‘सीबीएस न्यूज’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित

ज्या वेळी व्हाइट हाउसच्या अगदी जवळ हा गोळीबार सुरू होता, त्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इमारतीमध्येच उपस्थित होते. सीक्रेट सर्व्हिसने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे की, या घटनेत त्यांच्या कोणत्याही अधिकाऱ्याला दुखापत झालेली नाही आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पूर्णपणे सुरक्षित आहेतसीक्रेट सर्व्हिसच्या प्राथमिक तपास अहवालानुसार, ही घटना पूर्व समयानुसार (EST) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. एक संशयित व्यक्ती व्हाइट हाउसच्या बाहेरील एका सुरक्षा चौकीवर पोहोचली. त्या व्यक्तीने अचानक आपल्या बॅगेतून घातक शस्त्र काढले आणि तिथे तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांवर थेट गोळीबार सुरू केला. अधिकाऱ्यांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत चोख प्रत्युत्तर दिले आणि संशयितावर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button