
अन्न व औषध प्रशासनाकडून आता आंबा पिकविण्यावर करडी नजर
मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठमधील फळबाजारात आंब्याचा हंगाम सुरू असून सर्व ठिकाणांहून वेगवेगळ्धा प्रकारचे आंबे बाजारात येत आहेत. हे आंबे पिकवण्यासाठी व्यापारी चुकीच्या मार्गाचा अवलंब तर करत नाहीत ना याकडे अन्न व औषध प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे.
यासाठी संबंधित अधिकारी बाजारात सर्वत्र फिरत असून, संशयित वाटणार्या पिकवलेल्या फळांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जात आहेत. त्यामुळे चुकीच्या मार्गात पिकवत असलेल्या व्यापार्यार्यांचे धाबे दणाणले आहेत. वाशीच्या फळबाजारात सध्या विविध ठिकाणांहून आंब्याची भरपूर आवक होत आहे.
www.konkantoday.com




