अचानक विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने दापाेली 12 तास अंधारात, पर्यटकांच्यात नाराजी


शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि क्षणार्धात संपूर्ण तालुका अंधारात बुडाला. माेबाईल नेटवर्कपासून इंटरनेटपर्यंत सर्व यंत्रणा, काेलमडल्या. नागरिकांना पंखे, एसी, पाणीपुरवठा आणि अन्य मुलभूत सुविधांविना रात्र काढावी लागली. अनेक भागांमध्ये इन्व्हर्टरनेही हात टेकल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला हाेता. संपूर्ण शहर अंधारात गेल्याने पर्यटकांनी अक्षरशः डाेके धरले.
अनेक हाॅटेल्समध्ये जनरेटर व्यवस्था नसल्याने पाहुण्यांचे प्रचंड हाल झाले. काही पर्यटकांनी गाड्यांमध्ये एसी सुरू ठेवून रात्र काढली. अशा प्रकारचा अनुभव आयुष्यात पहिल्यांदाच आला, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक पर्यटकांनी व्यक्त केल्या.
पर्यटकांकडून सकाळीच परतीचा मार्ग हाॅटेल व्यावसायिक प्रतीक हेदूकर यांनी सांगितले की, रात्री अचानक वीज गेल्याने अनेक पर्यटक घाबरले. काहींनी रविवारी सकाळीच मुक्काम रद्द करून परतीचा मार्ग धरला. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला माेठा आर्थिक फटका बसला. हाॅटेल, लाॅ ज, हाेम-स्टे, आईस्क्रीम पार्लर, दूध व्यावसायिक आणि छाेटे व्यावसायिक यांचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले. महावितरणच्या निष्काळजीपणाचा सर्वात माेठा फटका आराेग्य यंत्रणेलाही बसला. अनेक खासगी हाॅस्पिटल्स आणि क्लिनिकमध्ये जनरेटरवर काम सुरू ठेवावे लागले. काही ठिकाणी ऑक्सिजन, तपासणी यंत्रणा आणि शीतगृह व्यवस्था धाेक्यात आली हाेती. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रात्रभर भीतीच्या छायेत वेळ काढला.
दरवेळी तीच कारणे, त्याच सबबी झी तालुक्यात वारंवार खंडित हाेणाèया बीज पुवठ्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ’दरवेळी तीच कारणे तेच तांत्रिक बिघाड आणि त्याच सबबी. मात्र कायमस्वरूपी
उपाययाेजना कधी हाेणार? असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. काेट्यवधी रुपयांची वीज बिले वसूल करणाèया महावितरणकडे अद्ययावत यंत्रणा, पर्यायी व्यवस्था आणि तातडीची दुरुस्ती प्रणाली का नाही, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button