
हातिवले टोल सुरू होणार असल्याने पुन्हा टोलविरोधी आंदोलन पेटणार?
मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या राजापूर तालुक्यातील हातिवले येथे असलेल्या टोलनाक्यावर टोल वसुलीसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. टोलवसुलीकरिता निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून दिल्लीतील एका कंपनीला टोल वसुलीचा ठेका देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर हातिवले टोलनाक्यावरून टोल वसुलीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान चार वर्षापूर्वी २१ डिसेंबर २०२२ रोजी टोल वसुली सुरू झाली होती. मात्र त्यावेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या अपुर्या कामांमुळे सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडल्यानंतर लगेचच टोल वसुली बंद करण्यात आली होती. त्यावेळी खासदार व विद्यमान आमदार निलेश राणे यंनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता. आता पुन्हा टोल वसुली सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे टोलविरोधी आंदोलन पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com




