साखरपा येथे खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स जळून खाक, प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला


रत्नागिरी कोल्हापूर महामार्गवर साखरपा जाधववाडीजवळ गद्रे पेट्रोल पंपासमोर खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
प्रवासी ट्रॅव्हल्स एन एल ०१बी २४४२ ही गाडी पुणे येथून काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तीस प्रवाशांना घेऊन पुण्याहून रत्नागिरीकडे निघाली होती साखरपा येथे आली असताना आज पहाटे ३.३० वाजता संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपा समोर आली असता गाडीने पेट घेतल्याचे चालकाच्या निदर्शनास आली असता प्रसंगावधान राखून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
. सर्व तीस प्रवासी सुखरूप आहेत ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे अग्निशमन दलाच्या गाडीने आग विझवण्यात यश आले असले तरी आगीत गाडी पूर्णतः भस्मसात झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button