
विष प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे विषारी द्रव प्राशन करणार्या महिलेचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मेनका युवराज चव्हाण (३२, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. मेनका हिने आपल्या राहत्या घरी उंदीर मारण्याचे विषारी द्रव प्राशन केले होते. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल केले. तसेच पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. १२ एप्रिल रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची नोंद शहर पोलिसात करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




