राजापुरात एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा गढूळ होत असल्याने नागरिकांच्यात नाराजी


राजापूर शहरातील नागरिकांना नगर परिषदेमार्फत होणारा दिवसाआडचा पाणीपुरवठा अत्यंत गढूळ स्वरूपाचा होत असल्याने नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. कोदवली धरणातील गाळ उपसला जात असल्याने ही समस्या ओढवली असली तरी सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात नागरिकांच्या तक्रारींच्या प्रमाणातही दररोज वाढ होताना दिसत आहे. पुरवठा होणारे गढूळ पाणी पिण्यायोग्य नाहीच. शिवाय त्यामुळे त्वचारोग निर्माण होण्याची शक्यता सभागृहातील बहुतेक सदस्यांनी व्यक्त केली आहे.
यंदा एप्रिलच्या माध्यमापासूनच तीव्र उन्हाळा असल्याने न.प. मार्फत शहराला पाणीपुरवठा होणार्‍या दोन्ही पाणीस्त्रोतांना मर्यादा आल्या आहेत. कोट्यावधी धरणातील पाणीसाठा आटला असताना शीळ जॅकवेलमधून होणार्‍या पाणीपुरवठ्यावर वारंवार खंडीत होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे न.प. ने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दिवसाआड येणारे पाणी देखील गढूळ येत असल्याने त्याबाबत नागरिकांतून तक्रारी होत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button