
रत्नागिरी पोलिसांच्या ‘रेड्स ॲप’ची नागपूर पोलिसांना मदत
रत्नागिरी : जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या दूरदृष्टीतून व नाविन्यपूर्ण उपक्रमातून विकसित करण्यात आलेल्या रेड्स ॲपच्या (RAIDS App) मदतीने नागपूर जिल्हा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. रेड्स ॲपच्या सहाय्याने मृत व्यक्तीच्या चेहऱ्याचे डिजिटल पुनर्निर्माण करण्यात आले. या तांत्रिक प्रक्रियेच्या मदतीने अवघ्या २ तासांत मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात यश आले.
नागपूर येथील वाडी पोलीस ठाणे हद्दीत जंगलमय परिसरात एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. या मृत व्यक्तीची ओळख पटविणे आव्हानात्मक ठरत असताना नागपूर पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांशी समन्वय साधला. रेड्स ॲपच्या सहाय्याने मृत व्यक्तीच्या चेहऱ्याचे डिजिटल पुनर्निर्माण (Photo Reconstruction) करण्यात आले. या तांत्रिक प्रक्रियेच्या मदतीने अवघ्या २ तासांत मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात यश आले.
ही मृत व्यक्ती दौलामेटी, आठवा मैल (नागपूर) येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराचे उत्कृष्ट उदाहरण असून, तपास प्रक्रियेला गती देणारी ठरली आहे.




