रत्नागिरी नगर परिषदेची आता प्लास्टिकविरोधात जोरदार मोहीम, १ एप्रिलपासून अंमलबजावणी


आर्थिक वर्षअखेरच्या कामांचा निपटारा झाल्यानंतर रत्नागिरी नगर परिषद प्लास्टिक प्रदूषणाविरोधात आक्रमक पवित्रा घेणार आहे. येत्या १ एप्रिलपासून शहरात प्लास्टिक विरोधी मोहिमेची कठोर अंमलबजावणी सुरू होणार असून प्रतिबंधित प्लास्टिक बाळगणार्‍या व्यावसायिकांवर ५ हजार रुपयांपासून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती नगर परिषद आरोग्य विभागाने दिली आहे.
शासकीय स्तरावर सध्या मार्चअखेरच्या कामकाजाची मोठी धावपळ सुरू आहे.
ही कामे पूर्ण होताच प्रशासनाचे पूर्ण लक्ष प्लास्टिक बंदीकडे वळणार आहे.  शासनाकडून आलेल्या विशेष सुचनांनुसार, १ एप्रिलपासून शहराच्या विविध भागांत पथकांद्वारे अचानक तपासणी केली जाईल यामध्ये प्रामुख्याने बाजारपेठा, किरकोळ विक्रेते आणि घाऊक व्यापार्‍यांकडील साठ्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे. या कारवाईत १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या, ५०  मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक शीट प्लास्टिक व थर्माकॉलपासून बनवलेल्या चाळ्या, कप, ग्लास, वाट्या, स्ट्रों, चमचे आणि सजावटीच्या साहित्यावर पूर्णतः बंदी असेल अशा वस्तूंचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक किवा विक्री करणायांवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.
दंडात्मक कारवाईच्या स्वरूपाबाबत माहिती देताना पहिल्यांदा गुन्हा आढळल्यास ५ हजार रुपये दंड आकारला जाईल. दुसर्‍यांदा नियम मोडल्यास १० हजार रुपये, तर तिसर्‍या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड आणि तीन महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागू शकते त्यामुळे व्यावसायिकानी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर तात्काळ थांबवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button