
रत्नागिरी जिल्ह्यात १ मे पासून डिजिटल जनगणना, प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण
डिजिटल जनगणनेसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
डिजिटल जनगणनेसाठी ३ हजार १२३ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकूण २ हजार ७३१ घर यादी गट निश्चित करण्यात आले आहेत. मोहिमेसाठी २ हजार ६२१ प्रगणक आणि ४६० पर्यवेक्षक असे एकूण ३ हजार १२३ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना तांत्रिक मदतीसाठी ४२ क्षेत्रीय प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे. ग्रामीण भागासाठी तहसिलदार तर शहरी भागासाठी मुख्याधिकारी हे ’चार्ज ऑफिसर’ म्हणून काम पाहणार आहेत. नागरिकांना जनगणनेत सहभागी करून घेण्यासाठी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत ’सेल्फ इन्युमरेशन’ प्रक्रिया राबवली जाणार आहे. नागरिक secensus.gov.inया संकेतस्थळावर जाऊन माहिती भरू शकतात. पोर्टलवर विचारलेल्या ३४ प्रश्नांची उत्तरे भरल्यानंतर नागरिकांना एक ’एसई आयडी’ प्राप्त होईल. हा आयडी जपून ठेवावा.
www.konkantoday.com




