रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गांवर भीषण अपघातआंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एक ठार


रत्नागिरी – कोल्हापूर मार्गांवरील आंबा घाटात साखरेचा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमद रामशेर ताहीर हुसेन अन्सारी (वय ३६, रा. भोटारावा पोष्ट कर्मा, ता. कोंडरमा, रा. झारखंड) हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच १० डी टी ४४०९) फलटण येथून साखरेची पोती भरून जयगड येथे जात असताना आज (२४ एप्रिल) सकाळी ५.४५ वाजता आंबा घाटातील महामार्गाचे काम सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी बंद रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळला. या अपघातात चालक महमंद रामशेर ताहीर हुसेन अन्सारी जागीच ठार झाला. अपघाताचे वृत्त समजताच लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, देवरुख पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस कर्मचारी तानाजी पाटील यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. या अपघाताचा तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button